पाण्याशप्पथ ई मेल-१
दि.१३ जुलै २००९
पाण्याला जीवन म्हणतात.
खरं तर संघर्ष म्हणायला हवं !
इतकं पाण्यात संघर्षाचं प्रतिबिंब पडलं आहे.
सुसंस्कृत समाजात कोणताही संघर्ष हा
कायद्याच्या चौकटीत सोडवला जाणं अपेक्षित असतं.
पाण्यावरून होणारे संघर्ष त्याला अपवाद नाहीत. नसावेत !
राज्यस्तरीय मोठे, मध्यम व लघू सिंचन प्रकल्प म्हणजे
प्रस्थापित विकास नीतीचा बालेकिल्ला !
या बालेकिल्ल्याला कोणते कायदे लागू आहेत ?
त्यांची अंमलबजावणी कशी होते? कोण करतं ?
समन्यायी पाणी वाटपात कायद्याआधारे काय करता येईल ?
या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न
"पाण्याशप्पथ" या ई मेल प्रबोधन मोहिमे द्वारा केला जाईल.
मला खात्री आहे की, आपणही या मोहिमेत योगदान कराल.
आपले मत मांडाल. मार्गदर्शन कराल.जे पटेल त्याबाबत कृति कराल.
समविचारी मंडळींना हे मेल पुढे पाठवाल.
ई मेल-२ मध्ये उद्या आपण
नवनवीन जल कायदे व महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम,१९७६
यांच्या नातेसंबंधांबद्दल विचार करू.
पुढचे पाठ मागचे सपाट असं तर होत नाहीये ना ?
पाहूयात.
धन्यवाद. आदराने, आपला स्नेहांकित,
प्रदीप पुरंदरे